अवघ्या सात महिन्या महाराष्ट्रात 21 लाख नवमतदारांची नोंद, पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढली
Voting | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Maharashtra Vidhan Sabha Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य निवडणुक आयोगाने राबविलेल्या मतदार (Voters) नाव नोंदणी उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अवघ्या सात महिन्यात तब्बल 21 लाख नवमतदारांची (New Voters) नोंद मतदार यादीच झाली आहे. विशेष म्हणजे या वेळी मतदार यादीत (Voter List) नाव नोंदणीत महिला मतदार आघाडीवर आहेत. तुलनात्मक दृष्ट्या पाहता नव्या मतदारांमध्ये पुरुष मतदारांची संख्या 10.4 लाख तर महिला मतदारांची संख्याही 10.8 लाख इतकी आहे.

नवमतदारांमुळे राज्यातील एकूण मतदारांची संख्याही चांगलीच वाढली आहे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांसह राज्यातील एकूण मतदारांची संख्या आता 8.9 कोटी इतकी झाली आहे. सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसा राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या 79% इतकी आहे. दरम्यान, राज्यातील एकूण पुरुष मतदारांची संख्या 4.7 कोटी तर महिला मतदारांची संख्या 4.3 कोटी इतकी आहे. आगामी विधानसभा निवडणुका विचारात घेऊन सरकारने 1 फेब्रुवारी ते ऑगस्ट फेब्रुवारी या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदणी कार्यक्रम हाती घेतला होता.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि तेही सात महिन्यांमध्ये मतदारांच्या संख्येत झालेल्या वाढीचे श्रेय तरुणांना दिले आहे. नव्या मतदारांमध्ये तरुण-तरुणींचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी केल्यामुळेच मतदारांची संख्या वाढू शकली असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार नावनोंदणी मोहीम 31 जानेवारीपूर्वी हाती घेतली होती. (हेही वाचा, राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार विधानसभा निवडणूक, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू; गिरीश महाजन यांची माहिती)

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 च्या तुलनेत 31 ऑगस्टपर्यंत झालेल्या मतदार नावनोंदणीत तब्बल 59 लाख मतदारांची वाढ झाली आहे. गेल्या सात महिन्यांचा विचार करता ही टक्केवारी 35% इतकी आहे. 2014 मध्ये एकूण मतदारसंख्या ही 8.4 कोटी इतकी होती. त्यात पुरुष मतदारांची संख्या 4.4 कोटी तर, महिला मतदारांची संख्या 3.9 कोटी इतकी होती.