Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर असल्याची माहिती आहे. दरम्यान या कलांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. हा निकाल हा लावून घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election Result 2024: वसईत हितेंद्र, तर नालासोपाऱ्यात क्षितीज ठाकूर आघाडीवर )
पाहा पोस्ट -
#WATCH | As Mahayuti has crossed halfway mark in Maharashtra, Shiv Sena UBT leader Sanjay Raut says, "They have done some 'gadbad', they have stolen some of our seats...This cannot be the public's decision. even the public does not agree with these results. Once the results are… pic.twitter.com/Qxx6a0mKsW
— ANI (@ANI) November 23, 2024
सध्याचा निकाल हा राज्यातील जनतेचा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या निवडणूकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला असून हा कौल कसा मानावा हा प्रश्न राज्यापुढे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात शरद पवारांचे वादळ असताना त्यांना दोन अंकी जागा मिळतान ा दिसत नसल्याचे दिसत असल्याने हा जनतेचा कौल असल्याचे मानायला आम्ही तयार नाही असे त्यांनी म्हणाले.
लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होणार नसल्याचे देखील खासदार संजय राउत यांनी म्हटले आहे. लाडकी बहिण योजनेमुळे हा निकाल लागल्याचे मला वाटत नसल्याचे यावेळी राऊत यांनी म्हटले आहे. गौतम अदाणी यांच्या अटक वॉरंट निघाल्यावर हे चित्र बदलेल असेही ते म्हणाले.