महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आघाडीवर
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

पालकमंत्री आणि भाजपचे (BJP) चर्चित आलेल्या कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत झालेल्या टपाल मतमोजणीत पाटील यांना आघाडी मिळवली आहे. पाटील यांनी पहिल्या फेरीनंतर 4062 मतं मिळाली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे (Kishor Shinde) त्यांना मजबूत फाईट देत आहे. ही लढत महत्वाची मानली जात आहे. भाजपने कोथरूड मतदारसंघातून पाटील यांना ऐन वेळी उमेदवारी दिली होती. आणि नंतर मनसेचे उमेदवार किशोर शिंदेंना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. पहिल्या फेरीच्या निकालानुसार भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरुडमध्ये पाटलांना मोठं आव्हान मिळत आहे. पाटील यांच्या उमेदवारीला तेथील लोकांकडून मोठा विरोधाला सामोरे जावे लागले होते. बाहेरील उमेदवार नको, घरचाच उमेदवार हवा, असा कोथरूकरांच म्हणणं होता. पहिल्या ट्रेंडनुसार पाटील यांनी 7,000 मतांनी आघाडी मिळाली आहे. यापूर्वी, एवढंच नाहीतर 200 च्या वर जागा जिंकणार असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात 27 जागा भाजपला तर 16 जागा शिवसेनेला मिळतील. तर आघाडीच्या जागा कमी होण्याची शक्यता दिसुन काँग्रेसला 7, तर राष्ट्रवादीला 15 आणि इतर एक उमेदवार विजयी होण्याची चिन्हे आहे. पश्चिम महाराष्ट्रातविधानसभेच्या एकूण 66 जागा असून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने 12, भाजपने 22, राष्ट्रवादीने 18, काँग्रेस 10 तर रासप, शेकपा, एमएनएस आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.