अशोक चव्हाण (Photo Credit: PTI)

भोकर (Bhokar), ही यावर्षी महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षासाठी सर्वात महत्त्वाचे मतदारसंघ मानले जात आहे. आणि याचे मुख्य कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांचा निकाल आज लेण्याची सुरुवात झाली आहे. एकीकडे, भाजप-शिवसेनेच्या महायुतीला जनतेची स्पष्ट पसंती मिळाली आहे. दुसरीकडे, त्याच्या काही दिग्गज नेत्यांचा परभाग झाला आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाडा आठ मतदारसंघामध्ये अनेक प्रसिद्ध नेत्याच्या प्रतिष्ठेची लढाई होत आहेत. यातील भोकर विधानसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रिंगणात होते. सर्व एक्सिट पोलने चव्हाणांचा पराभव दर्शवला होता. पण, यासर्वांना न जुमानता चव्हाणांनी विजय खेचून आणला आहे. (Maharashtra Vidhansabha Elections Results: महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांची मात ; मातोश्रीच्या अंगणात शिवसेना पराभूत)

सध्याच्या निवडणुकीच्या कालानुसार, चव्हाणांना भोकर, नांदेड मतदारसंघातून 1 लाख पेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. चव्हाणांच्या जवळ कोणताही उमेदवार उभा राहिलेला दिसत नाही. त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवले श्रीनिवास उर्फ बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांना फक्त 30 हजार मतं मिळाली आहे. चव्हाणांनी गोरठेकरांचा तब्बल 70 हजार पेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे.

नांदेड जिल्ह्यत एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहे. आणि या जिल्ह्याच्या राजकारणात आजवर चव्हाण कुटुंबीयांनी वर्चस्व गाजवले आहे. नांदेड, हा चव्हाण कुटुंबीयांचा गड मानला जातो. अशोक, हे देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहे. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.