वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ: मातोश्रीच्या अंगणात 27 वर्षीय जीशान सिद्दीकी याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना चारली धूळ
Maharashtra Assembly Election Result 2019 (File Image)

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात (Vandre East Assembly Constituency)  आज शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना काँग्रेस (Congress) पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी अनपेक्षित मताधिक्याने पराभूत केले आहे. हा पराभव शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मातोश्रीच्या अंगणात झाला असल्याने चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

काही वेळेपूर्वी महाडेश्वर आणि सिद्दीकी यांच्यात अवघ्या 2000 मतांची चढाओढ होती मात्र त्यानंतर अखेरच्या फेरीत सिद्दीकी यांनी लीड घेत तब्बल 4000 हजारहून अधिक मताधिक्याने महाडेश्वर यांना धूळ चारली. याठिकाणी शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी देखील बंडखोरी करत यंदा अपक्ष म्ह्णून उमेदवारी दाखल केली होती, यांनंतरही त्यांना वांद्रे पूर्व मधून 20 हजारच्या घरात मते पडली होती पण अखेरीस आता झिशान सिद्दीकी यांनी 3603२ मते प्राप्त करत याठिकाणी विजयी पताका रोवला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विश्वान्तहा महाडेश्वर यांना 31747 मते तर त्यांच्या पाठोपाठ तृप्ती सावंत यांना 2385६ मते मिळाली आहेत तर AIMIM चे उमेदवार मोहम्मद कुरेशी यांनी देखील 12426 मते प्राप्त केली आहेत. तर मुख्य विरोधक म्हणून समोर आलेलया मनसेच्या अखिल चित्रे यांना मात्र 10403 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभेत सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ होता. ठाकरे कुटुंबीय या मतदारसंघाचे रहिवासी असल्याने मुंबईतील हा एक हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. यंदा शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर विरूद्ध कॉंग्रेसचे झिशान सिद्दकी आणि मनसेचे अखिल चित्रे असा सामना रंगला होता, ज्यामध्ये अनपेक्षितपणे सिद्दीकी यांनी बाजी मारली आहे.