कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राधानगरी हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. राधानगरी तालुक्याचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. आजही या भागात सोयी सुविधांचा अभावच आहे. येथील दवाखाने 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहेत. कळ्ळमावाडी धरण, राधानगरी धरण, तुळशी धरण अशी 3 धरणे या तालुक्यात आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या पदांनी पावन झालेला विभाग राधानगरी तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासून राधानगरी मतदारसंघात आश्चर्यचकीत करणारा इतिहास अनेकांना विचार करायला भाग पाडेल. या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याच पक्षाला सलग दोनवेळा बाजी मारता आली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथम शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया 1962 सालापासून राधनगरी या ठिकाणी पार पडत आहेत. केवळ काँग्रेस सोडले तर, अजूनही कोणत्याच पक्षाला राधानगरी मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवता आला नाही. काँग्रेसने 1978, 1980 साली विजय मिळवला होता. राधानगरी मतदारसंघातील विजयांची यादी पुढील प्रमाणे-
काँग्रेस- 1962
पीडब्ल्यूपी- 1967
अपक्ष- 1972
काँग्रेस- 1978
काँग्रेस- 1980
आयसीएस- 1985
जेडी- 1990
अपक्ष- 1995
काँग्रेस- 1999
अपक्ष- 2004
एनसीपी- 2009
शिवसेना- 2014
विधानसभा निवडणूक २०१४च्या निकालानुसार शिवसेना पक्षाचे आमदार प्रकाश आनंदराव यांनी राष्ट्रवादीच्या केपी पाटील यांचा पराभव करून ही विधानसभा जागा ताब्यात घेतली. प्रकाश आनंदराव यांना 1 लाख 32 हजार 485 मत पडली होती, तर केपी पाटील यांना 93 हजार 077 मत मिळाली होती. विधानसभा निवडणुकीला क्षुल्लक दिवस बाकी राहिले असून राधानगरी मतदारसंघात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.