Ahmednagar Assembly constituency (Photo Credit: File Photo)

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ येतात. नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोला, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, अहमदनगर, पारनेर, राहूरी, शेवगाव अशी या मतदारसंघांची नावे आहेत. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

अकोला मतदारसंघ क्रमांक- 216

वैभव पिचड पुढील आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अकोले मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांनी आपले आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. विधानसभा निवडणूक 2014 साली राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांना 67 हजार 696 मत पडली असून त्यांनी शिवसेना पक्षाचे मधूकर तळपदे यांचा 20 हजार 062 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये अकोला मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- वैभव पिचड (भाजप), डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी)

संगमनेर मतदारसंघ क्रमांक- 217

काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बाळासाहेब थोरात यांनी सलग सहावेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा करिष्मा केला आहे. काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार जनार्दन आहेर यांचा मोठ्या अंतराने पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 3 हजार 564 मत पडली होती. तसेच या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवार यांचा 58 हजार 805 मतांनी पराभव केला होता.  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये संगमनेर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- रावसाहेब नवले (शिवसेना), बाळासाहेब थोरात (काँग्रेस)

शिर्डी मतदारसंघ क्रमांक- 218

विधानसभा निवडणूक 2014 साली काँग्रेस पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु विखे पाटलांनी नुकताच विरोधी पक्षाचा राजीनामा दिसला आहे. विखे पाटील यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार अभय शेळके पाटील विरुद्ध उभा होते. या निवडणुकीत विखे पाटील यांना 1 लाख 21 हजार 459 मत पडली होती तर, शेळके यांना 46 हजार 797 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिर्डी मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), सुरेश जगन्नाथ थोरात (काँग्रेस)

कोपरगाव मतदारसंघ क्रमांक- 219

कोपरगाव मतदारसंघात विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजप पक्षाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचा 99 हजार 763 मतांनी विजय झाला होता. कोल्हे यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे उभे होते. स्नेहलता यांनी काळे यांना 29 हजार 270 मतांनी पराभूत केले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये कोपरगाव मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- स्नेहलता कोल्हे (भाजप), आशुतोष काळे (राष्ट्रवादी)

श्रीरामपूर मतदारसंघ क्रमांक- 220

श्रीरामपूर तालुक्यात सध्या 52 गावांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. विधानसभा निवडणूक 2014 काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा विजय झाला होता. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाराम वाकचौरे त्यांच्या विरोधात उभे होते. कांबळे यांना 57 हजार 118 मत पडली असून वाकचौरे यांना 45 हजार 634 मत पडली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये श्रीरामपूर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), लहु कानडे (काँग्रेस), भाऊसाहेब पगारे (अपक्ष)

नेवासा मतदारसंघ क्रमांक- 221

लोकसभा निवडणूक 2009 नंतर नेवासा तालुका स्वतंत्र मतदारसंघ झाला आहे. नेवासा हा स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख हे यामतदार संघाचे प्रतिनिधी झाले.  विठ्ठलराव लंघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधक संपला अस चित्र निर्माण झाले होते. मात्र,  काँग्रेस पक्षाचे  तात्कालीन तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे पुढे आले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने 2 जिल्हापरिषद गट तसेच 2 पंचायत समिती गणात विजय मिळवला, एक गटात अतिशय निसटता पराभव झाला. त्यानंतर मुरकुटे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत गेले. शंकरराव गडाखांचा पराभव करून ते निवडून आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये नेवासा मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- बाळासाहेब मुरकुटे (भाजप)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.