
विधानसभा निवडणुकांची धामधुम सगळीकडे दणक्यात सुरु असून सर्वच पक्षांकडून आश्वासनांचा पूर वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress-NCP) आज (7 ऑक्टोबर) आपला शपथनामा जाहीर केला. या शपथनाम्यात जनतेसाठी ब-याच योजना आखण्यात आल्या आहेत. ज्यात शेतकरी, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य अशा ठळक मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), अनिल गोटे, एकनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीत आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात बेरोजगारांसाठी महत्वपुर्ण योजना राबविण्यात येणार आहे. ज्यात बेरोजगारांनी 5,000 रुपये 'बेरोजगारी भत्ता' देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 131 जागा तर काँग्रेस आणि मित्र 157 जागा लढणार आहे. त्यामुळे निवडणुकीची आघाडीने जोरदार तयारी सुरु केली असून त्यासाठी आज शपथनामा देखील प्रसिद्ध केला. यात राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना स्वतंत्र कृषी बजेट, संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व विना अनुदानित शाळा अनुदानित करणार, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा रुग्णालय अधिक आधुनिक बनवणार, अशी आश्वासने या जाहिरनाम्यातून देण्यात आली आहे. हेदेखील वाचा-
तसेच कामगारांना किमान वेतन २१ हजार करणार, केजी टू पीजी मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्क्यानी कर्ज, सर्व महापालिकांमध्ये 500 फुटापर्यंत मालमत्ता कर माफ, 80 टक्के भूमिपूत्रांना नोकऱ्या, निम अंतर्गत घेतलेल्या कामगारांना कायम करणार, बचत गटांना 2 हजार कोटी अर्थ साहाय्य, खासगी सावकारांकडे जप्त जमिनी शेतकऱ्यांना परत करणार असल्याचे आश्वासन शपथपत्रातून देण्यात आले आहे. हेही वाचा- धुळे: भाजप, गिरीश महाजन यांना धक्का, अनिल गोटे आघाडीच्या गोटात, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर लढणार
त्याचबरोबर युवक काँग्रेसने महाराष्ट्रातील तरुणांसाठी स्वतंत्र असा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य या मुद्द्यांवर प्रकाश टाकला गेला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे 'वेक अप महाराष्ट्र' या अभिनव उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. खास युवकांसाठी बनविलेला देशातील हा पहिलाच जाहीरनामा आहे.