पैशाच्या वादातून एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह धरणात फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पनवेल (Panvel) तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून अटक केली आहे. संबंधित महिलेचे मुख्य आरोपीशी अनैतिक संबध होते. आरोपीने संबंधित महिलेकडून काही पैसे घेतले होते. याच वादातून त्यांच्या नेहमी वाद होत असे. याच वादातून आरोपीने आपल्या 3 मित्रांच्या मदतीने संबंधित महिलेची हत्या केली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी महिलेच्या मृतदेहाला दगड बांधून मोर्बो धरणात फेकले. मात्र, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगाताना दिसल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही कोप्रोली गावात राहत असून तिच्या पतीचे गेल्या काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तसेच तिला 7 वर्षाचा मुलगादेखील आहे. मात्र, या महिलेचे 32 वर्षीय युवकाशी अनैतिक संबंध होते. या महिलेकडून त्याने काही पैसेही घेतली होते. या पैशांवरुन त्यांच्यात नेहमी वाद होत होते. त्या वादातूनच त्याने साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अवघ्या 48 तासात या खुनाचा उलगडा पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सातारा कोरेगाव येथून अटक केली गेली आहे. हे देखील वाचा- मुंबई: लॉकडाउन मध्ये सहा महिने वडापावचा धंदा बंंद, पैसे नाही म्हणुन विक्रेत्याची बिल्डिंगवरुन उडी मारुन आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी अवघड झाले होते. मात्र, या महिलेच्या एका हातामध्ये असलेल्या बांगड्या आणि गोंदलेल्या चिन्हाच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला. तब्बल 12 तासांनी मृत महिलेची ओळख पटली. त्यानंतर पुढील तपासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.