Home Quarantine (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचा (COVID19) विळखा घट्ट होताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. मात्र, कोरोना विषाणूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण हे मुंबई (Mumbai), पुणे (Pune) येथे आढळून आले आहेत. यातच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील (Ruby Hall Hospital) एका 45 वर्षीय परिचारीकेला कोरोनाची संसर्ग झाला आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 30 परिचारिकांना क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या मेडिकल सर्व्हिस विभागाचे संचालक संजय पाठारे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एक 45 वर्षांच्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 30 परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या सुट्टीहून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एका कोरोना रुग्णावर उपचारही केले होते. त्यानंतर त्यांना सौम्य लक्षणे दिसायला लागली होती. त्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह निघाली, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांच्या सपर्कात आलेल्या 30 परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या मेडिकल सर्व्हिस विभागाचे संचालक संजय पाठारे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Lockdown: शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी गावांकडे स्थलांतर करु नये, त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे राज्यातील जनतेला आवाहन

एएनआयचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 8 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 775 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1895 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.