Lok Sabha Elections 2019: गडचिरोली मध्ये मतदान करून परतणार्‍यांवर काळाचा घाला; ट्रॅक्टर अपघातामध्ये 3 ठार 9 जखमी
Gadchiroli (Photo Credits: Twitter)

Lok Sabha Elections 2019 First Phase Poll:  महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आज पहिल्या टप्पातील लोकसभा मतदान सुरू आहे. सात मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरू असताना गडचिरोली चिमूर (Gadchiroli) या लोकसभा मतदार संघामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. मतदान करून परतणार्‍या एका ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी आहेत. Lok Sabha Elections 2019 Phase 1 Voting: सुरक्षेच्या कारणास्तव गडचिरोली मध्ये ऐनवेळी बदलली मतदान केंद्र

ANI ट्विट 

गडचिरोलीमधील शंकरपूर गावात मतदान करून परताना दुर्देवी अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. गडचिरोली चिमूर या मतदारसंघ नक्षलग्रस्त भागामध्ये येतो. मतदानाच्या काळात दोन वेळेस या भागात नक्षलवाद्यांनी भूसुरूंग लावून स्फोट घडवला आहे. त्यामुळे काही मतदान केंद्र दूर हलवण्यात आली. अशावेळेस नागरिकांना उन्हात धावपळ करावी लागत आहे. सध्या महाराष्ट्रात उन्हानेदेखील चाळीशी पार केल्याने मतदानाला थंड प्रतिसाद आहे. Lok Sabha Elections 2019 First Phase Poll Live Updates: विदर्भातील 7 मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये आज दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान करण्याची वेळ होती.