Accident (PC - File Photo)

Madya Pradesh Accident: मध्य प्रदेशात सोमवारी दोन ठिकाणी अपघात झाला. मंदसौर आणि सिहोर जिल्ह्यात दोन वेगवेगळे अपघात झाले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जण जखमी झाले. मंदसौरमधील सीतामळ येथील 7 लेन रोडवर सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दिल्ली- मुंबई महामार्गावर बेलारीजवळ एसयुव्ही कारची एका थांबलेल्या ट्रकला धडकली. समोरून जात असलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक चालकाने गाडी थांबवली होती आणि पाठी मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली अशी माहिती प्रत्यक्षदर्क्षींनी दिली. (हेही वाचा- नाशिक मध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी 2 भीषण अपघात; 3 ठार 5 जखमी)

मिळालेल्याम माहितीनुसार, मंदसौर येथील कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकचा टायर फुटल्याने रस्त्याच्या मध्योमध थांबले होते. दरम्यान भरधाव एसयुव्ही कार मागून आली धडकली. या धडकेत दोन स्त्रीयांचा आणि एक चालक आणि एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जखमींना मंदसौर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालक कोटाहून रतलामच्या दिशेने जात होता.

दुसरीकडे सिहोर जिल्ह्यात सकाळी 1च्या दरम्यान भेरुंडा गोपाळपूर रस्त्यावर कार अनियंत्रित झाल्याने अपघात झाला आहे. एसयूव्ही ओव्हरस्पीड झाल्याने अनियंत्रित झाली आणि कार उलटली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, कार सुमारे 200 मीटरपर्यंत रस्त्यावर घसरले. अपघातात कारचे संपुर्ण नुकसान झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.