नववर्षाच्या पहिल्या दिवशी आज मुंबई नाशिक रस्त्यावर (Mumbai Nashik Road) भीषण अपघाताची (Accident) एक घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी बायपास (Igatpuri Bypass) जवळ बोरटेंभे (Bortenbhe) मध्ये हा अपघात झाला आहे. मर्सीडीज कार आणि आयशरची जोरदार धडक झाली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. पहाटे चार च्या सुमारास हा अपघात झाला आहे. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने धडक दिली
अपघाताचे वृत्त मिळताच तातडीने रूग्णवाहिका, पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी नजिकच्या जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.या अपघातामुळे काही काळ मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. Jharkhand Road Accident: जमशेदपूर येथे अनियंत्रित कारचा भीषण घात, 6 जणांचा मृत्यू .
नाशिक मध्येच दुसरा अपघात पाचपाखाडी भागात झाला आहे. टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडकली. या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक हायवे वरून सकाळी टाटा सुमो ठाण्याच्या दिशेने जात असताना सकाळी 7 च्या सुमारास गाडी पाचपाखाडी भागात आली असता, गाडीचे मागील चाक पंक्चर झाले आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ही गाडी रस्त्याकडेला विटांनी भरलेल्या एका टेम्पोला धडकली. यात मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
नाशिक मधील अपघातात जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये संतोष कुमार आणि विकास कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.