Madhya Pradesh | FIle Photo

मध्य प्रदेशामध्ये छिंदवाडामध्ये (Chhindwara)  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसबी लावून पाडल्याने शिवसैनिकांसोबतच अनेक हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता हा पुतळा हटवल्याने अनेकांनी नारजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकारानंतर शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान दोघांनीही मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेश: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी आक्रमक आंदोलनानंतर नगरपालिकेकडून सांमजस्याची भूमिका; लवकरच मोहगावात बसवणार नवा पुतळा.  

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचं समजताच शिवभक्तांनी संतप्त होत नागपूर - छिंदवाडा हायवे रोखून आंदोलन केले होते. दरम्यान यावेळेस स्थानिक दुकानं आणि बाजारपेठा बंद ठेवत या घटनेचा निषेध करण्यात आला होता. मात्र नगरपालिका प्रशासनावर चौफेर टीका होत असताना त्यांनी लवकरच पुन्हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

उदयनराजे भोसले ट्वीट

खासदार संभाजीराजे ट्वीट

"संपूर्ण देशाचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील स्मारक JCB ने काढण्यात आले. ज्याप्रकारे स्मारक हलवण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे." असे मत उदयनराजे भोसले यांनी मांडले आहे तर संभाजीराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून निषेध करताना "छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून पाडत असलेला व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं. मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने व पक्षाच्या अध्यक्षांनी याचा त्वरित खुलासा करावा. जनाक्रोश एवढा जास्त आहे, की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. " असं ट्वीट केलं आहे.