Madgyal Sheep: माडग्याळ मेंढी, किंमत फक्त 16 लाख रुपये; घ्या जाणून
Madgyal Sheep | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माडग्याळ मेंढी (Madgyal Sheep). अवघ्या मेंढपाळ आणि हौशी लोकांचे लक्ष वेधून घेणारी मेंढ्यांची प्रजात. या प्रजातीची मेंढी खरेदी करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. होय, त्यासाठी तुम्हाला दुचाकीपेक्षाही अधिक किंवा नोकरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या वार्षीक पॅकेजपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागू शकते. सांगली येथे याचाच एक प्रत्यय आला आहे. सांगली (Sangli) येथील एका शेळी मेंढी बाजारात माडग्याळ प्रजातिच्या सहा मेंढ्यांची चक्क 14 लाख रुपयांना विक्री झाली आहे. किंमत ऐकुन कदाचीत अनेकांना धक्का बसला असेल. पण असे घडले आहे. मेंढीला इतकी किंमत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांने त्या मेंढीची मिरवणूकही काढली आहे.

माडग्याळ मेंढीला इतक्या मोठ्या प्रमाणावर किंमत मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही माडग्याळ प्रजातिच्या मेंढीला अशा प्रकारची किंमत मिळाली आहे. मात्र, या व्यवहारामुळे सांगलितील जत तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माडग्याळ मेंड्यांचा हा व्यवहार जत तालुक्यातील शेळी-मेंढी बाजारात झाला. (हेही वाचा, World's Most Expensive Sheep: तब्बल साडेतीन कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी मेंढी Double Diamond; स्कॉटलंडच्या लिलावात तीन शेतकऱ्यांनी केली खरेदी (See Pictures & Videos))

प्राप्त माहितीनुसार, माडग्याळ येथील मयप्पा चौगुले यांच्या मेंढ्यांना इतका विक्रमी दर मिळाला आहे. मयप्पा चौगुले यांनी आपल्या मेंढ्या जत येथील शेळी-मेंढी बाजारात आणल्या होत्या. एकूण सहापैकी प्रत्येक मेंढी 2,38000 रुपयांना विकली गेली. मेंढ्यांना इतका विक्रमी दर मिळाल्याने आनंदित झालेल्या मयप्पा यांनी चक्क मेंढ्यांची हलगी लावून मिरवणूक काढली.

माडग्याल मेंढीचे वैशिष्ट्य म्हणजेच ही प्रजात दिसायला प्रचंड रुबाबदार दिसते. खास करुन मेंढीचे नाक आकर्षक असते. तसेच, या मेंढ्याचे मांस खायला अत्यंत रुचकर आणि तितकेच चविष्ट असते. त्यामुळे या मेंढ्यांन प्रचंड मागणी असते. महत्त्वाचे असे की, माळरानावर अत्यंत कमीक चाऱ्यात तग धरणारी प्रजात अशीही या मेंढीची ओळख आहे. या मेंढ्या शेतकऱ्यांना चांगलाच भाव मिळवून देत आहेत.