मुंबई मध्ये सायन - पनवेल हायवे (Sion Panvel Highway) वर आज (22 नोव्हेंबर) एका लक्झरी बसला (Luxury Bus) आग लागण्याची दुर्घटना समोर आली आहे. दरम्यान ही घटना रात्री उशिराची आहे. बसला आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाल्या. दरम्यान सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या सानपाडा जवळ सायन- पनवेल हायवेवर उभ्या असलेल्या लक्झरी बसने पेट घेतला होता. या आगीत संपूर्ण बस खाक झाली आहे. या आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमायला सुरूवात झाली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बसच्या आतमधून आग पेटताना दिसत आहे. आगीची तीव्रता पाहून आजुबाजूचे लोक देखील हैराण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी त्यावर नियंत्रण मिळवले. Mumbai Fire: मुंबईतील नायर रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश.
सायन पनवेल महामार्गानजीक सानपाडा येथे खासगी बसला आग, बस जळून खाक#पनवेल #Panvel #NaviMumbai #Fire pic.twitter.com/3ZjQuoHBW4
— Anand N. Ingle (@anand_ingle89) November 22, 2020
काल मुंबई प्रमाणेच मध्य प्रदेश मधील नरसिंहपूर मध्येही एका प्रवासी बसला आग लागल्याची घटना समोर आली होती. यामध्ये प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडाधड बस मधून उड्या मारल्या होत्या. ही बस गाडरवारा वरून पिपरियाला जात होती. चालत्या बसने अचानक पेट घेतला होता.