Rohit Pawar Threatens Cops (फोटो सौजन्य - Twitter)

Rohit Pawar Threatens Cops: गुरुवारी रात्री मुंबईत हायव्होल्टेज राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या अटकेविरोधात पोलिस ठाण्यात थेट जाऊन आवाज उठवला. आझाद मैदान पोलिस ठाण्यात (Azad Maidan Police Station) पोहोचल्यावर पवार आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या शारीरिक बाचाबाचीनंतर वाद निर्माण झाला.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात हाणामारी सुरू झाली, जिथे आव्हाड यांचे सहकारी असलेले देशमुख यांच्यावर पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी देशमुख यांच्या अचानक अटकेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन गाठलं. परंतु, येथे पोलिस अधिकारी आणि रोहित पवार यांच्यात बाचाबाची झाली. (हेही वाचा - विधिमंडळ परिसरात कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडी समोर आडवे; पक्षपातीपणाचा आरोप करत पुन्हा राडा)

तुमचा आवाज खाली ठेवा - रोहित पवार

देशमुख कुठे आहेत याबद्दल स्पष्ट उत्तरे न मिळाल्याने, रोहित पवार समर्थकांसह आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले, जिथे तणाव शिगेला पोहोचला. पवार आणि एका पोलीस उपनिरीक्षक यांच्यात झालेला वाद कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी रोहित पवार पोलिस अधिकाऱ्याला म्हणत आहेत की, 'तुमचा आवाज कमी करा. जर तुम्ही आदराने उत्तर देऊ शकत नसाल तर अजिबात बोलू नका.'

तथापी, यावेळी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. नंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी त्यांच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी म्हटलं की, 'जेव्हा पोलीस अधिकारी दोन विद्यमान आमदार आणि एका माजी मंत्र्यासोबतही उद्धटपणे वागतात, तेव्हा कल्पना करा की ते सामान्य माणसाशी कसे वागत असतील. ते संकोच न करता एखाद्याच्या कानशीलात लगावू शकतात.'

पोलिसांच्या भूमिकेमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, पहाटे 2 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून फक्त ‘हो सर, हो सर’ म्हणत होते. लोकशाहीत हे चालत नाही.' या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कायदा अंमलबजावणीमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप करण्यात येत आहे.