Shirdi Airport  कमी दृश्यमानतेमुळे मागील 5 दिवसांपासून ठप्प
Shirdi Airport | PC: Twitter/ Deepakk75058621

शिर्डी एअरपोर्ट (Shirdi Airport) वर दृश्यमानता कमी (Low Visibility) असल्याने मागील 5 दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात प्रार्थनास्थळं खुली करण्याचा निर्णय झाल्यानंतर 7 ऑक्टोबर पासून विमानसेवा देखील खुली करण्यात आली होती. नियमित 10 विमानं उडवण्याचा निर्णय झाला होता मात्र केवळ दोनचं विमानं आकाशात झेपावू शकली. 11 ऑक्टोबर दिवशी केवळ एक फ्लाईट उड्डाण करू शकले. बारी सारी विमानं दृश्यमानता कमी असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. नक्की वाचा: Pune Airport Update: पुणे एअरपोर्ट रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे 16-29 ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार .

Maharashtra Airport Development Company Limited यांच्या अख्यत्यारित  शिर्डीचं विमानतळ आहे. एप्रिल 2022 मध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत असताना शिर्डीचं विमानतळ बंद करण्याचा निर्णय झाला. शिर्डीचं साईबाबांचं मंदिरं बंद ठेवण्यात आल्याने शिर्डीची विमानसेवा देखिल बंद होती.

Deepak Kapoor, VC-MD of MADC यांनी काल ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, 'शिर्डीचं विमानतळ दृश्यमानता कमी असल्याने बंद आहे पण आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी आणि आयएमडीच्या संपर्कात आहोत' असं ते म्हणाले आहेत.

कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता रात्रीच्या वेळेस लॅन्डिगसाठी देखील डीजीसीए ने विशेष पाहणी केली आहे. त्याची परवानगी प्रतिक्षित आहे. 2019 साली देखील अशाच समस्येमुळे सुमारे महिनाभर विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी काही एअरलाईन्सने त्यांचा बेस औरंगाबादला वळवला होता.