Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडामुळे भाजपने (BJP) राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे आज रोजी जरी एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्ये सरकार सत्तेत असले तरी भविष्यातील निवडणुकांमध्ये लोकांचा कौल काय असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर शिंदे गट आणि भाजपने ज्या पद्धतीने सत्तांतर केले ते लोकांना फारसे रुचले नसल्याचे दिसते. आज रोजी जरी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा असूनही महाराष्ट्रातील जनता भाजपला आणि पर्यायाने शिंदे गाटाला (Eknath Shinde Camp) धक्का देईन असे चित्र आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने हे चित्र भाजपसाठी चकीत करणारे आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून (Loksabha Election Survey) हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांचा सर्व्हे सांगतो की, भाजप आणि शिंदे गटाने घडवून आणलेले सत्तांतर राज्यातील जनतेला सध्यातरी भावले नाही. जनतेच्या मनात तीव्र नाराजी असून ही नाराजी आगामी काळात आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी आज जरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तरी त्यापैकी 30 जागा संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीए (UPA) ला मिळतील. भाजप प्रणित रोष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला 18 जागांवर फटका बसेल. भाजपसाठी हे फार धक्कादायक आहे. कारण भाजपने 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक युतीद्वारे लढवली होती. त्यामुळे त्याचा फायदा होऊन भाजप आणि शिवसेनेच्या मिळून 48 पैकी 42 जागा विजयी झाल्या होत्या. (हेही वाचा, Bhavana Gawali tied Rakhi to PM Narendra Modi: 'ईडीच्या शुभेच्छा ताई साहेब', शिवसेना खासदार भावना गवळी यांना रक्षाबंधन दिवशी अनोख्या शुभेच्छा)

शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीमुळे राज्यातील सत्ता समिकरणे बदलली आहेत. शिवसेनेचे एकूण 18 खासदार आहेत. परंतू, एकनाथ शिंदे गटाच्या बंडामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 6 खासदार शिल्लख राहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाकडील खासदारांची संख्या 36 इतकी आहे. असे असले तरी सध्या लोकमत युपीएच्या बाजूने दिसते आहे. अर्थात अद्याप पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. वाद न्यायालयात परलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागतो यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. सध्या तरी जनमत महाविकासआघाडीच्याच बाजूने दिसते.