
Maha Vikas Aghadi Seat Allocation Formula: देशभरात सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आकारास आलेल्या I-N-D-A आघाडी सध्या फारशी चर्चेत नाही. महाराष्ट्रात मात्र इंडिया आघाडीचा घटक असलेली महाविकासआघाडी जोरदार सक्रीय आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha elections 2024) संदर्भात शिवसेना (UBT),राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहे. दरम्यान, ही बोलणी बऱ्यापैकी पूर्ण झाली असून जागावाटपाचे सूत्रही निश्चित झाल्याची चर्चा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत तर कोणत्या पक्षाला किती जागा आणि ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबतही निश्चितता आली आल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात TV-9 ने दिलेल्या वृत्ता मविआचा जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, पक्षनिहाय मतदारसंघांची नावेही दिली आहेत. या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) 19 ते 21, काँग्रेस 13 ते 15 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 12 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच एकूण 48 पैकी 46 मददारसंघांची निवड झाली आहे. उर्वरीत चार मतदारसंघांवर जागावाटपाची चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे.
महाविकासआघाडी जागावाटपाचे संभाव्य चित्र (सूत्रानुसार)
मुंबई
दक्षिण मुंबई : शिवसेना (ठाकरे गट), दक्षिण मध्य : शिवसेना (ठाकरे गट), ईशान्य मुंबई : शिवसेना (ठाकरे गट), उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेना (ठाकरे गट), उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस, उत्तर मुंबई : काँग्रेस
कोकण
रत्नागिरी सिंधुदुर्ग : शिवसेना (ठाकरे गट), रायगड : शिवसेना (ठाकरे गट), कल्याण : शिवसेना (ठाकरे गट), पालघर : शिवसेना (ठाकरे गट), ठाणे : शिवसेना (ठाकरे गट), भिवंडी : राष्ट्रवादी (शरद पवार)
विदर्भ
नागपूर : काँग्रेस, वर्धा : काँग्रेस, चंद्रपूर : काँग्रेस, गडचिरोली : काँग्रेस, भंडारा गोंदिया : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार), अमरावती : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार), यवतमाळ-वाशिम : शिवसेना (ठाकरे गट), बुलढाणा : शिवसेना (ठाकरे गट), रामटेक : शिवसेना (ठाकरे गट), अकोला : वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव, अन्यथा काँग्रेस
मराठवाडा
नांदेड : काँग्रेस, लातूर : काँग्रेस, धाराशिव : शिवसेना (ठाकरे गट), छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (ठाकरे गट), परभणी : शिवसेना (ठाकरे गट), बीड : राष्ट्रवादी (शरद पवार), हिंगोली : राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (ठाकरे गट), जालना : राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (ठाकरे गट)
उत्तर महाराष्ट्र
धुळे : काँग्रेस, नंदुरबार : काँग्रेस, जळगाव : राष्ट्रवादी (शरद पवार), रावेर : राष्ट्रवादी (शरद पवार), दिंडोरी : राष्ट्रवादी (शरद पवार), नगर : राष्ट्रवादी (शरद पवार), नाशिक : शिवसेना (ठाकरे गट), शिर्डी : शिवसेना (ठाकरे गट)
पश्चिम महाराष्ट्र
पुणे : काँग्रेस, सोलापूर : काँग्रेस, बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार), माढा : राष्ट्रवादी (शरद पवार), सातारा : राष्ट्रवादी (शरद पवार), शिरूर : राष्ट्रवादी (शरद पवार), कोल्हापूर : शिवसेना (ठाकरे गट), मावळ : शिवसेना (ठाकरे गट), सांगली : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार), हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव, अन्यथा राष्ट्रवादी (शरद पवार)
दरम्यान, वर दिलेले मतदारसंघनिहाय जागावाटप टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताच्या आधारे देण्यात आले आहे. महाविकासआघाडीच्या कोणत्याही नेत्याकडून अथवा अधिकृत प्रवक्त्यांकडून या जागावाटपाबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात मात्र या जागावाटपावरुन जोरदार चर्चा आहे.