भाजप (संग्रहित प्रतिमा)

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिक येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 2024 बाबत ध्येयनिश्चिती केली. त्याला 'महाविजय 2024' असे नावही दिले. महत्त्वाचे म्हणजे भाजपने 'महाविजय 2024' (Mahavijay 2024) मध्ये लोकसभा निवडणूक 2024 ( Lok Sabha Elections 2024) साठी महाराष्ट्रातून 'मिशन 45' हे ध्येय ठेवले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी एकूण 48 जागा असताना भाजपने नेमके 45 जागांचेच ध्येय का ठेवले? तसेच 48 पैकी 45 वगळता राहिलेले ते दोन मतदारसंघ कोणते? ज्या मतदारसंघामध्ये भाजपला विजाची खात्री नाही किंवा भाजप या ठिकाणी लढण्यासाठी घाबरत आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या दोन जागा भाजप मित्रपक्षाला देणार का? अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे प्रदेश संयोजक (निवडणूक इन्चार्ज) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच बैठकीत महाराष्ट्र भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी 'महाविजय 2024' हा संकल्प केला. उल्लेखनिय म्हणजे भाजपने 'मिशन 45' तर, विधानसभेसाठी 'मिशन 200' ची घोषणा केली आहे. भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या द्वारे ही घोषणा करण्यात आली. (हेही वाचा, Bjp On Lok Sabha Vidhan Sabha Election 2024: 'बोलताना तोंडावर ताबा ठेवा', भाजपकडून मंत्र्यांना सक्त ताकीद; राजकीय भूमिका मांडण्याची केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच मुभा)

शिंदे गटाला केवळ 2 जागा?

महाराष्ट्राचा विचार करता विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. तर लोकसभेसाठी एकूण 48 जागा आहे. असे असताना भाजपने लोकसभेसाठी 45 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे भाजपने लोकसभेसाठी सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य न ठेवता केवळ 45 जागांचेच लक्ष्य का ठेवले? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. तसेच, या जागा भाजप न लढवता मित्र पक्षांना देणार की भाजपला या ठिकाणी निवडणूकच लढवायची नाही? असा सवाल विचारला जातो आहे. दुसऱ्या बाजूला या जागा शिंदे गटासाठी सोडल्या जाणार असल्याचीही चर्चा आहे. असे घडले तर शिंदे गटासाठी लोकसभेला केवळ दोन जागा मिळणार की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.