Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार आणि शरद पवार (Sharad Pawar)यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supria Sule) बारामती (Baramati) मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुक लढवणार आहे. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीबद्दल माहिती पुढे आली आहे. यामध्ये त्यांनी जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती दिली असून त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाची संपत्ती 165 कोटी 42 लाख 89 हजार रुपये आहे. तर 2014 रोजीच्या लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत 32 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या नावावर एकडी गाडी नसल्याचे समोर आले आहे. सुळे कुटुंबियांची सरासरी उत्पन्न 6.41 कोटी रुपये आहे. एवढच नसून सुळे परिवारातील अन्य सदस्यांची संपत्ती 165 कोटी रुपयांच्या घरात आहे.(हेही वाचा-हुश्श्य! अखेर काँग्रेसला उमेदवार मिळाला; पुणे येथून मोहन जोशी निवडणुकीच्या रिंगणात)
बारामतीमधील माळेगाव आणि ढेकळवाडी येथे सुद्धा सुप्रिया सुळे यांची जमीन आहे. या जमिनींची किंमत जवळजवळ एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुंबई आणि पुणे येथे सुप्रिया सुळे यांचे दोन फ्लॅटसुद्धा आहेत.