Lok Sabha Elections 2019: रणजीत सिंह नाईक निंबाळकर माढा मतदार संघाचे भाजप उमेदवार;  मोहिते-पाटील यांचा  पत्ता कट
Ranjeetsingh Hinduraoji Naik Nimbalkar ( Photo Credits: Facebook)

Madha Lok Sabha Constituency: कॉंग्रेसमधून भाजपा पक्षामध्ये प्रवेश केलेल्या रणजित सिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Hinduraoji Naik Nimbalkar) यांना माढा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे संजय मामा शिंदे (Sanjay Shinde) यांच्याविरूद्ध भाजपाचे रणजित निंबाळकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांनी माढा मधून उमेदवारी मागे घेतल्यानंतर या मतदार संघामध्ये कोण लढणार या नावाची खूप चर्चा रंगली होती. .Ajit Pawar: मोहिते-पाटील यांचा फोन स्विच ऑफ होता, राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक तिकीट त्यांनाच तर देणार होते

ANI ट्विट

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांनी त्यांच्या मुलगा रणजित सिंह यांना तिकीट मिळवं यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याला प्रसिसाद न मिळाल्याच चित्र स्पष्ट होताच रणजित सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर या मतदार संघात विद्यमान खासदार विजयसिंग मोहिते पाटीलांनीही भाजपाच्या तिकीटावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपाने अखेर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर केले आहे. Lok Sabha Elections 2019: माढा लोकसभा मतदार संघातून संजय शिंदे आणि उस्मानाबाद मधून राणा पाटील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा

माढा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चुरसीची लढाई होणार आहे. हे मतदान तिसर्‍या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल 2019 दिवशी होणार आहे.