आज देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) तिसऱ्या टप्प्यातील मतदान अगदी उत्साहात पार पडत आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गजांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला आहे. (Lok Sabha Elections 2019 Phase-3 Voting Maharashtra Live News Updates: मतदानास सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील मतदान करत राज्यघटनेतील आपला सर्वोच्च अधिकार बजावला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे त्यांनी मतदान केले.
ANI ट्विट:
Social activist Anna Hazare after casting his vote in Ralegan Siddhi,Ahmednagar District, Maharashtra. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/KAGwbSc1EQ
— ANI (@ANI) April 23, 2019
देशात 7 टप्प्यात तर राज्यात 4 टप्प्यात मतदान होणार असून आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, सोमवारी होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जनतेचा कौल लक्षात येईल.