Lok Sabha Elections 2019 Phase 2 Voting: केवळ दिव्यांग कर्मचारी चालवत आहेत बुलढाणा येथील पोलिंग बुथ नंबर 193
Polling booth number 193 in Buldhana (Photo Credits: Twitter)

Buldhana Polling Booth Number 193: भारतामध्ये आज 13 विविध राज्यातील 95 मतदान केंद्रांवर (Polling Booth) लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान सुरू आहे. एकूण सात टप्प्यात होणार्‍या या मतदानामध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान आहे. महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांमध्ये मतदान आहे. त्यापैकी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील पोलिंग बुथ नंबर 193 खास ठरला आहे. हा बुथ केवळ दिव्यांग कर्मचार्‍यांकडून (Specially Abled Staff) चालवला जात आहे. Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?

दिव्यांग कर्मचारी

देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील सार्‍याच घटकांनी मतदान करणं आवश्यक आहे. बुलढाणा येथील पोलिंग बुथ नंबर 193 मध्ये केवळ दिव्यांग कर्मचार्‍यांकडून चालवला जातो. या बुथवर दिव्यांगांनी येऊन मतदान करावं असं आवाहन मतदान केंद्र प्रमुखांनी केलं आहे. गर्भवती-दिव्यांगाना रांगेविना मतदान करण्यासाठी प्रवेश देणार, निवडणुक अधिकाऱ्यांचा निर्णय

महाराष्ट्रातील 10 मतदार संघांचा समावेश आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर येथे मतदान पार पडेल. महाराष्ट्रातील दुसर्‍या टप्प्यातील मतदानामध्ये अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, प्रीतम मुंडे यांच्या सारख्या दिग्गज राजकारण्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.