Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर आता सत्तेत असलेल्या सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारी या परिस्थितीमुळे नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे (Maharashtra Swabhiman Party) अध्यक्ष आणि भाजप (BJP) पक्षाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटले आहे. त्याचसोबत सरकारच्या सुरु असलेल्या कारभारावर सुद्धा राणे यांनी टीका केली आहे.
रत्नागिरीत नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नारायण राणे यांनी सरकावर टीका करच गेल्या पाच वर्षात सर्वत्र व्यवस्यांवर संकट आले असून बंद होण्याची वेळ आली आहे. तसेच व्यापाऱ्यांची पिळवणूक केली जात असून लोकांचे छळ सरकारकडून केली जात असल्याची जोरदार टीका राणे यांनी यावेळी केली.(हेही वाचा-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर)
त्याचसोबत शिवसेना पक्षावर सुद्धा राणे यांनी टीका करत असे म्हटले की, शिवसेना आता लूट सेना उरली आहे. तर सेनेच्या नेतृत्वामुळे लोकांना देशोधडीला लावले गेले आहे. मुंबईतील मराठी लोकांची संख्या कमी झाली असून 60 टक्क्यांवरुन 18 पर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे आता कोकणातून ही सेनेला हद्दपार केल्याशिवाय जनतेचे चांगले दिवस येणार नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे.