मालाड: उर्मिला मातोंडकर हिच्या मालाड येथील प्रचार रॅली मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावच्या घोषणा
उर्मिला मातोंडकर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Lok Sabha Election 2019  Election Campaign:  काँग्रेस (Congress) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबईतून (Mumbai North Constituency) उर्मिला मातोंडर (Urmila Matondar) हिला उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच राजकरणात प्रवेश केल्यानंतर तिने निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत लोकांची मने जिंकत असल्याचे दिसून येत आहे. मात्र उत्तर मुंबईतील भाजप (BJP) आणि काँग्रेस  पक्षात वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर मंगळवारी (16 एप्रिल) उर्मिला ही मालाड (Malad) येथे प्रचार रॅलीसाठी आली होती. त्यावेळी काही तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावाच्या घोषणा करण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हा उर्मिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

सोमवारी बोरीवली येथे सुद्धा उर्मिला प्रचार रॅलीसाठी आली होती. त्यावेळी सुद्धा काही तरुणांनी 'मोदी...मोदी' अशा घोषणा दिल्या. त्यावेळी उर्मिला हिने या तरुणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु मंगळवारी सुद्धा मालाड येथील प्रचार रॅलीदरम्यान तोच प्रकार दिसून आला. मात्र त्यावेळी उर्मिला आणि कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला. त्यामुळे भाजप पक्षाची खिल्ली उडवली जात असल्याचे बोलले जात आहे.(हेही वाचा-बोरीवली: 'उर्मिला मातोंडकर' च्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हुल्लडबाजी; उर्मिलाने दाखल केली पोलिस तक्रार)

उत्तर मुंबईतून भाजप कडून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेट्टी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने उर्मिला हिला उमेदवारी दिली आहे. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले जात आहेत.