बोरीवली: 'उर्मिला मातोंडकर' च्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हुल्लडबाजी; उर्मिलाने दाखल केली पोलिस तक्रार
Urmila Matondkar (Photo Credits: Twitter/ Urmila Matondkar)

Lok Sabha Election 2019  Election Campaign:  मुंबईमध्ये 29 एप्रिलला होणार्‍या  लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. आरोप प्रत्यारोपाचा फैरी रंगत असताना आज मुंबईच्या बोरीवली लोकसभा मतदार (Borivali Lok Sabha Constituency)  संघात कॉंग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन ठाकले आणि जोरात घोषणाबाजी केली. उर्मिला मातोंडकरच्या (Urmila Matondkar) प्रचारादरम्यान कॉंग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याने अखेर उर्मिलाने पोलिसात तक्रात दाखल केली. भाजप पक्षाकडून उर्मिला मातोंडकर हिच्याविरुद्ध तक्रार दाखल; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

ANI ट्विट

ऊर्मिला मातोंडकरला कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज प्रचारादरम्यान गोंधळ झाल्याने उर्मिला नाराजी व्यक्त करत बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांचा हुल्लडबाजीचा निषेध करते. माझ्या स्त्री कार्यकर्त्यांच्या सुरक्षे कारणास्तव मला पोलिस तक्रार करावी लागत आहे अशा आशयाचं ट्विट तिने लिहले आहे.

ऊर्मिला मातोंडकर ट्विट

उर्मिला मातोंडकरच्या विरोधात भाजपाचे गोपाळ शेट्टी रिंगणात उतरले आहेत. यंदा महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक होईल. त्यापैकी अंतिम टप्प्यात म्जणके 29 एप्रिलला मुंबईत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 मे 2019 ला होणार आहे.