Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून मावळ मतदार संघासाठी (Maval Lok Sabha Constituency) पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पवार घराण्याकडून पार्थ यांच्याबद्दल जोरदार प्रचार केला जात असून सोशल मीडिया हे सर्वात महत्वाचे माध्यम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या विजयासाठी सोशल मीडियावर प्रचार करण्याची जबाबदारी त्यांचे सख्खे भाऊ जय पवार (Jay Pawar) करणार आहेत.
पवार घराण्याची तिसरी पिढी राजकरणात आली आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या पिढीला संधी देण्यासाठी शरद पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे सध्या पार्थ पवार यांच्या बद्दल आगामी लोकसभा निवडणुकीत जास्त मत मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पनवेल येथे प्रचारासाठी उशिर होतोय म्हणून पार्थ पवार यांची पळापळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)
त्यामुळे सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी तरुण वर्गाचा सहभाग महत्वपूर्ण असल्याने जय पवार हे पार्थ पवार यांचा सोशल मीडियावर प्रचार करण्यास मदत करणार आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त तरुण वर्गापर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया खुप फायदेशीर ठरणार आहे.