मुंबई येथील कामगारांना मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी, कामगार विभागाचे आदेश
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई (Mumbai) आणि उपनगर येथे 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर कामगारांना मतदान करता येण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असा आदेश कामगार विभागाने दिली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी याबद्दल अधिक माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. तर मुंबईतील संबंधित आस्थापनांनी कामगारांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी देणार असल्याचे निर्देशन दिले आहे. मुंबई येथील अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने आणि आस्थापने सोडून सर्व आस्थापनांना उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यासाठी महाराष्ट्र उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाद्वारे अधिसूचना काढण्यात आली.(Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रात चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवार दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी मतदान)

पुण्यात मतदान फार कमी झाले. तर मुंबईत 60 टक्क्यांपेक्षा जास्त व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणताही कपात करु नये असे सुद्धा अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.