Lok Sabha Elections 2019: मतदान केल्यास नाशिक येथे महिलांसाठी मोफत थायरॉइड तपासणी
Representational Image (Photo Credits: File Photo)

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणूकीची धूम आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. तसंच मतदारांसाठी मतदान केंद्रावर खास सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्याचबरोबर मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी सामाजिक संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील क्रस्ना डायग्लोस्टिक्स या संस्थेतर्फे मतदान करणाऱ्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन-भटेवरा यांनी दिली. (गर्भवती-दिव्यांगाना रांगेविना मतदान करण्यासाठी प्रवेश देणार, निवडणुक अधिकाऱ्यांचा निर्णय)

महिलांमध्ये थायरॉईडचे वाढते प्रमाण, त्याकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासोबतच आरोग्याबाबत सजग राहण्याचा सल्ला या योजनेमार्फत दिला जाणार आहे. (महाराष्ट्रात अपंग मतदारांसाठी घरपोच सेवेसह विशेष सुविधा उपलब्ध; जाणून घ्या अपंग मतदारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा)

कुठे घ्याल या योजनेचा लाभ?

मतदान केल्यापासून बोटावरची शाई जाईपर्यंत तुम्ही या मोफत तपासणीचा लाभ घेऊ शकता. नाशिकमध्ये बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड, स्वामी समर्थ हॉस्पिटल, अंबड, झाकीर हुसेन हॉस्पिटल द्वारका, इंदिरागांधी हॉस्पिटल, पंचवटी, नामको हॉस्पिटल, पेठरोड या केंद्रांवर तुम्ही मोफत तपासणी करु शकता.