Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी औरंगाबाद (Aurangabad) मतदार संघातून अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज भरला होता. परंतु आता सत्तार यांनी तो अर्ज मागे घेतला आहे.
औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे सत्तार नाराज होतेच मात्र अपक्ष म्हणून निवडणुक लढवल्यास पराभव होण्याची शक्यता फार होती. यासाठी अब्दुल सत्तार यांनी अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच येत्या सात दिवसात अब्दुल सत्तार काँग्रेसला पाठिंबा देणार का याबद्दल निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: भाजप मधून पत्ता कट झाल्यानंतर स्मिता वाघ राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार?)
तत्पूर्वी सत्तार यांनी दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच सिल्लोड येथून अपक्ष म्हणून उमेदवारी दिल्यास भाजपने पाठिंबा द्यावा अशी अट सत्तार यांनी फडणवीस यांच्या समोर ठेवली होती.