Lok Sabha Election Results 2019: उर्मिला मातोंडकर ची निवडणूक आयोगाकडे तक्रार; EVM नंबर आणि स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचा आरोप
उर्मिला मातोंडकर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

लोकसभा निवडणूक निकालाचे कल हाती येताच मुंबईसह देशभरात एनडीएच्या गोट्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईमध्ये सहाही लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबई उत्तर विभागात अभिनेत्री आणि कॉंग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हीने ईव्हीएम मशीनवरील क्रमांक आणि सही वेगवेगळी असल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ट्विटरवरून उर्मिला मातोंडकर हीने ही माहिती दिली आहे. Maharashtra Lok Sabha Election Results 2019: मुंबई मध्ये शिवसेना - भाजपा युतीचं 6 लोकसभा मतदार संघांमध्ये वर्चस्व; कॉंग्रेसचा सुपडा साफ

उर्मिला मातोंडकर ट्विट

उर्मिला मातोंडकर हिच्या ट्विटनुसार, मागाठणे येथील EVM 17C च्या ईव्हीएम मशीनच्या नंबर आणि सहीमध्ये तफावत असल्याचं समोर आलं आहे.

सुरूवातीच्या कलांनुसार मुंबई उत्तर विभागात गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये लढत आहे. पण गोपाळ शेट्टी आघाडीवर आहेत.