आज रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरात सभा घेऊन महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या गद्दार आमच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत. जे पळून गेले ते कशामुळे गेले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे डरपोकांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये. (हेही वाचा - Chhagan Bhujbal: मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा; छगन भुजबळांचा महायुतीला घरचा अहेर)
या सभेपुर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून विरोधकांवर गंभीर आरोप केले. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवून सरकार स्थापन करणार होते, या आरोपावरही आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले, संजय राऊत हे जेलमध्ये गेले आणि निष्ठावान राहिले. माघारी परतल्यानंतरही त्यांची निष्ठा ढळलेली नाही. त्यामुळे विनाकारण आरोप करण्यात काहीही अर्थ नाही.
खोके सरकारने त्यांच्या काळात राज्यामध्ये एकही नवा उद्योग आणलेला नाहीत. उलट राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला गेले. त्यामुळे गद्दारांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना हल्ला चढवला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरात सभा घेत शिवसेनेवर टिका केली होती.