Sanjay Nirupam | (Photo Credit: X)

Shiv Sena (UBT) Candidate List: महाविकासआघाडीतील घटक शिवसेना (UBT) पक्षाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच काँग्रेस (Congress) पक्षाकडून तीव्र नाराजी व्यक्त करत आघाडी धर्म पाळला जावा, अशी मागणी होऊ लागली आहे. खास करुन सांगली आणि मुंबई येथील तीन जागांवरील उमेदवार मुदतीपूर्वीच जाहीर केल्याने काँग्रेसनेते नाराज झाले आहेत. त्यातील काहींनी पक्षाच्या प्रकृतीला साजेशी भूमिका सौम्य शब्दात व्यक्त केली आहे. मात्र, काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी काहीशा आक्रमक स्वरुपात आपली भूमका व्यक्त केली आहे. त्यातच मुंबई वायव्य लोकसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा उल्लेख त्यांनी थेट 'खिचडी चोर' (Khichdi Chor) असा केला आहे. त्यामुळे वातावरण काहीसे बिनसल्याचे बोलले जात आहे.

संजय निरुपम हे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. काँग्रेसही मुंबईतील काही जागांवर आग्रही होती आणि आहे. मात्र, तत्पूर्वीच शिवसेना (UBT)  गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत गुंता निर्माण झाल्याचे समजते. दरम्यान, मुंबईतील चार जागांसाठी लोकसभेचे उमेदवार मुदतीपूर्वी जाहीर केल्याबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर (यूबीटी) जोरदार हल्ला चढवल्यानंतर बुधवारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) पक्षांमधील मतभेद उघड झाले. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) Candidate List: शिवसेना (UBT) उमेदवारांची यादी जाहीर, अनिल देसाई, अरविंद सावंत, यांच्यासह प्रमुख चेहरे मैदानात; कट्टर नेत्यांना संधी)

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई येथे आज (27 मार्च) एक पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना ते म्हणाले, अमोल कीर्तिकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम जागेसाठी उमेदवारी जाहीर करणे हे "युती धर्माचे उल्लंघन" आहे. या वेळी बोलताना त्यांनी शिवसेना (UBT) नेत्याला "खिचडी चोर" म्हटले आहे. ते म्हणाले, सेनेने खिचडी चोराला तिकीट दिले आहे.. आम्ही खिचडी चोर उमेदवारांसाठी काम करणार नाही. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर करताच कॉंग्रेस कडूनही उघड नाराजी व्यक्त; सांगली, दक्षिण मध्य मुंबई च्या जागेवर पुनर्विचार केला पाहिजे - बाळासाहेब थोरात)

खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना कोविड-19 महामारीदरम्यान स्थलांतरितांना खिचडी वाटपातील कथित अनियमिततेच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने समन्स आहे. त्यानंतर लगेचच निरुपम यांची टिप्पणी आली आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या हस्तक्षेपाची मागणी करत निरुपम यांनी शिवसेनेवर (यूबीटी) मुंबईतील सहा जागांपैकी फक्त एक जागा एकतर्फी देऊन मुंबईत पक्षाला "दफन" केल्याचा आरोप केला. Sanjay Nirupam Video: संजय निरुपम यांचा काँग्रेस नेतृत्वाला इशारा, 'जास्तीत जास्त एक आठवडा थांबेन आणि मग निर्णय घेईन' .

व्हिडिओ

निरुपम यांनी पुढे म्हटले आहे की, शिवसेनेने टोकाची भूमिका घेऊ नये. यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होईल. काँग्रेस नेतृत्वाने हस्तक्षेप करावा, असे मला वाटते. हा हस्तक्षेप झाला नाही तर पक्ष वाचवण्यासाठी युती तोडावी. शिवसेना (UBT) सोबतची युती हा पक्षासाठी सर्वात मोठा धोका असेल, असेही निरुपम म्हणाले.

शिवसेना (UBT) पक्षाकडून पलटवार

निरुपम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे (UBT) खासदार अरविंद सावंत म्हणाले, "ते (निरुपम) कोण आहेत? मला माहीत नाही. आमच्या पक्षात शिस्त आहे. एकदा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर तो विषय आमच्यासाठी कायमचा संपतो.

व्हिडिओ

दरम्यान,, शिवसेनेने (UBT) महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि सांगितले की ते राज्यातील 48 पैकी 22 जागा लढवणार आहेत. शिवसेनेने (UBT) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी आमदार संजय पाटील यांना उत्तर-पूर्व मुंबईतून उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि अरविंद सावंत यांना अनुक्रमे रायगड आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने पाचही विद्यमान लोकसभा खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मुंबई दक्षिण-मध्यमधून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.