Prakash Ambedkar | (Photo Credits-Twitter/ANI)

Lok Sabha Election 2019: वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या सभेत 'छोटा पाकिस्तान' (Small Pakistan) असा उल्लेख करण्यात आला असल्याचे समजते. सोलापूर येथील 'नई जंदगी' हा परिसर मुस्लिम बहुल परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसराबाबत बोलताना हा उल्लेख करण्यात आला. आंबेडकर यांचे कट्टर समर्थक आणि माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) यांनी भाषणादरम्यान हा उल्लेख केला. या उल्लेखबद्दल गायकवाड यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त लोकसत्ता डॉट कॉमने दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रमोद गायकवाड हे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अॅड. आंबेडकर हेसुद्धा मंचावर उपस्थित होते. या वेळी बोलताना गायकवाड यांनी 'छोटा पाकिस्तान' असा उल्लेख केलाच. परंतु, काँग्रेस उमेदवाराबद्दल बोलतानाही त्यांचा शाब्दीक तोल गेल्याचे पाहायला मिळाले. वादग्रस्त वक्तव्य करत गायकवाड बोलत असताना त्यांना कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: अरुणाचल प्रदेश येथे जनेतला पैसे देऊन भाजपचा मत विकत घेण्याचा प्रयत्न, काँग्रेस पक्षाचा आरोप)

Solapur Lok Sabha constituency

सोलापुरमध्ये सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर, डॉ. जयसिद्धेश्वर महाराज हे भाजप उमेदवार आहेत. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर, सुशिलकुमार शिंदे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महाराज असा सामना रंगणार आहे. गायकवाड हे भाषण करत असताना निवडणूक आयोग भरारी पथकाचे अधिकारी अजयकुमार बचुटे उपस्थित होते. बुचटे यांनीच एमआयडीसी पोलिसात गायकवाड यांच्याविरोधात अचारसंहिता भंगाची फिर्याद दिल्याचे समजते. दरम्यान, सभेसाठी आयोजक म्हणून परवानगी घेणारे अर्जदार श्रीशैल गायकवाड यांच्यावरही अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.