भारतामध्ये एकीकडे कोरोना व्हायरसचं संकट असताना आता शेतकर्यांसमोर टोळधाडीचं (Locust) संकट आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश, राजस्थानामध्ये धुडघुस घातल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विदर्भातही टोळधाडीचा धोका आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आढललेले टोळ हळूहळू गोंदियामध्ये (Gondia) शिरकाव करण्याच्या तयारीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आज (28 मे) दिवशी सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा मध्ये झाडांवर, पीकांवर औषध फवारणी करण्यात आली आहे. भंडारामध्ये कृषी विभागाची वेळीच पोहचल्याने पहाटे पीकांवर औषध फवारणी करण्यात आली आहे. फायर टेंडर्सच्या माध्यमातून टेमाणी गावामध्ये एक किमीच्या परिसरामध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. अशी माहिती डिव्हिजनल जॉईंट डिरेक्टर रवी भोसले यांनी PTI संस्थेला बोलताना दिली आहे.
PTI Tweet
Maharashtra: Locust swarms head towards Gondia, authorities alerted.
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2020
भंडारामध्ये आज सकाळी आंबा, मोहा, जांभूळ, बेर या पीकांवर टोळ पहायला मिळाले. मात्र औषधफावारणी केली असल्याने मोठ्या प्रमाणात टोळ मरून पडलेले देखील पहायला मिळाले. प्रामुख्याने आंब्याच्या झाडावर ते मोठ्या प्रमाणात होते. आंब्याची पानं खातात पण फळांचं नुकसान करत नाहीत. आता भंडारा मधून गोंदियाच्या दिशेने ते पुढे सरकत आहेत.
Locust Attack In Maharashtra: महाराष्ट्रात टोळधाड दाखल; फळभाज्या, पालेभाज्यांचे मोठे नुकसान - Watch Video
अमरावती जिल्ह्यातल्या वरुड, मोर्शी, मेळघाट या भागात मध्यप्रदेशच्या सीमेवरून आलेल्या टोळधाडीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. या टोळधाडीनं संत्री, मका आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.