Marella Discovery (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान,गेल्या महिन्याभरापासून मरिला डिस्कव्हरी (Marella Discovery) क्रुझवर 146 नाविक आणि खलाशी अडकून पडल्याची बातमी सर्व वृत्तवाहिनीवर झळकत होती. तसेच त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशाही मागणी जोर धरला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या 146 भारतीय खलाशी आणि नाविक यांना मुंबई (Mumbai) बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भातील एक आदेश जारी केला.

समुद्रात गेल्या महिन्यापासून मरिला डिस्कव्हरी क्रुझ शिपवर अडकून पडलेल्या 146 नाविक आणि खलाश्यांची अखेर सुटका होणार आहे. 2 ते 6 एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होती. दरम्यान, कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने लाएम चाबँग या थायलँड येथे 14 मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ 12 एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली. पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात 14 एप्रिल रोजी पोहचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे अखेर या 146 खलाशी आणि नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री उशिरा तसा आदेशच जारी करण्यात आला असून उद्या या खलाश्यांना मुंबई बंदरावर उतरवण्यात येणार आहे. या सर्वांची तपासणी करण्यात येणार असून त्यांना एका इमारतीत क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी

ट्वीट-

कोरोना Coronavirus विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचे झपाट्याने वाढते प्रमाण पाहता या खलाशांची रितसर वैद्यकीय तपासणी होणार आहे. गरज भासल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करण्यात आली आहे.