कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान नाशिक (Nashik) मधून मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सतना (Satna) या आपल्या मूळ गावी पायी परतत असताना एका गरोदर महिलेने बाळाला जन्म दिला आहे. शकुंतला असे या महिलेची नाव असून हे तिचे चौथे आपत्य आहे. याबाबत सेंधवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एस. परिहार यांनी माहिती दिली. भररस्त्यात या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि रस्त्यातच तिची प्रसूती झाली. पोलिसांच्या माहितीनुसार आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. Coronavirus Update In Maharashtra: आज महाराष्ट्रात कोरोनाचे 1,278 नवे रुग्ण, 53 मृत्यू; राज्यातील बाधितांचा आकडा 22,171 तर COVID19 चे एकूण 832 बळी
शकुंतला या नाशिक मध्ये आपल्या परिवारासोबत राहतात. मात्र त्यांचे मूळ गाव हे मध्य प्रदेश येथील आहे. लॉक डाऊन मध्ये अडकून पडल्याने त्यांनी कुटुंबासोबतच पायी जाऊन मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कुटुंबासोबत त्यांनी प्रवास सुरु केला.नाशिक आणि धुळे याच्या मध्ये असताना त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या आणि तिथेच त्यांनी बाळाला जन्म दिला. कुटुंबातील महिलांनी या महिलेची भर रस्त्यात प्रसूती केली सुदैवाने यात नवजात बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. भारतीय रेल्वे 12 मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करणार; irctc.co.in वर करता येणार बुकिंग
PTI ट्विट
Woman travelling on foot from Maharashtra to native village in Satna, Madhya Pradesh, delivers child en route: Police
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2020
दरम्यान, प्रसूतीनंतर हे कुटुंब बिजासन चेकपोस्ट येथे पोहचले, तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. इथून या कुटुंबाला मध्य प्रदेशाती मूळ गावी पार्ट पाठवण्यासाठी बसची सोय करून देण्यात आली आहे.