Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 1,278 नवे रुग्ण आढळले आहेत तसेच 53 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा (Coronavirus Patients In Maharashtra)  एकूण आकडा हा 22,171 इतका झाला आहे तर आजवर कोरोनाने 832 बळी घेतले आहेत. याबाबत महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे तर आज बुलढाणा जिल्हा हा पूर्णतः कोरोनमुक्त होऊन ग्रीन झोन मध्ये गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार राज्यातील जिल्ह्यांचे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभाजन करण्यात आले आहे. या पैकी तुम्ही राहत असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

प्राप्त माहितीनुसार कोरोनाचा सर्वात जास्त फक्त बसलेल्या शहरांपैकी मुंबई मध्ये आज आज कोविड 19 (COVID19 ) चे 875 नवे रुग्ण आढळले आहेत. यानुसार एकट्या मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 हजार 564 वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत 508 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3004 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहराला कोरोनाचा फटका बसला आहे. पुण्यात आज घडीला 2830 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत यापैकी 938 रुग्ण बरे झाले आहेत तर कोरोनाबाधित 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ANI ट्विट

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी पहा

दरम्यान, मागील 24 तासांत देशात 3277 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 127 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाले आहेत तर एकूण 2109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.