साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेला वाद हा चिघळत चालला असून त्याचे रुपांतर आजपासून सुरु झालेल्या बंदात झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. शिर्डी कृती समितीचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी याबाबतची घोषणा केली. आज रात्री 12 नंतर हा बंद मागे घेण्यात येईल. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही पुढील दिशा ठरवू असे सांगण्यात येत आहे.
शिर्डी कृती समितीचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, उद्या मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही पुढील दिशा ठरवू. उद्या दुपारी 2 वाजता. ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यावेळी गावकरीही उपस्थिती राहतील, असेही कोते म्हणाले.
ANI चे ट्विट:
Maharashtra: Locals of Shirdi call off bandh tomorrow. A bandh was called today in #Shirdi town, against Chief Minister Uddhav Thackeray's reported comment calling Pathri, (in Parbhani) Sai Baba's birthplace.
— ANI (@ANI) January 19, 2020
हेदेखील वाचा- शिर्डी बंद करुन वाद संपणार नाही- छगन भुजबळ
"ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल" अशी घोषणा केली होती. यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक होऊन पाथरी मध्ये 100 नव्हे तर 200 कोटींची कामे केली तरी चालतील पण त्या ठिकाणाला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून संबोधू नका असा पवित्र स्वीकारला होता.
शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘साईसतचरित्र’मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हंटले आहे. याच बाबींच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.