Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

मध्य रेल्वेच्या माटूंगा वर्क शॉर्प मध्ये सिनियर सिटीझन साठी राखीव खास कोच सह असलेली लोकल ट्रेन सज्ज झाली आहे. हा कोच देखील दिव्यांगांना, सामान ठेवण्यासाठी असलेल्या कोच प्रमाणे स्वतंत्र कोच असणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉप मध्ये, येत्या काही दिवसांत सप्टेंबर 2026 पर्यंत त्यांच्या उर्वरित 163 गाड्यांमध्येही बदल करेल. ही ट्रेन या आठवड्यापर्यंत लवकरच चालू होण्याची अपेक्षा आहे. या खास डब्यामुळे उपनगरीय गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरताना, विशेषतः गर्दीच्या वेळी, प्रवासात येणाऱ्या अडचणींना तोंड देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल आणि आरामदायी, सुरक्षित प्रवास करता येईल.

सप्टेंबर 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्यानंतर लोकल गाड्यांमध्ये बदल सुरू करण्यात आला. हे प्रकरण वकील आणि निवृत्त सरकारी कर्मचारी के पी पुरुषोत्तम नायर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतून पुढे आहे. त्यांनी मुंबईच्या उपनगरीय गाड्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी असलेल्या वेगळ्या कोचप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कोच उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे मदत मागितली होती.

जरी प्रत्येक ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या दोन सामान्य डब्यांमध्ये सात जागा असतात, तरीही त्या ठिकाणी पोहोचणे हे एक आव्हान आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, गर्दीच्या सामान्य डब्यांपासून वाचण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये चढतात. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यावेळी न्यायालयाला माहिती दिली होती की रेल्वे बोर्डाने सुधारणांचा प्रस्ताव मंजूर केला आहे, जो पुढील दोन वर्षांत विद्यमान रेल्वे सेवांना अडथळा न आणता तयार केला जाईल.