
मीरा रोडच्या (Mira Road) एका दाम्पत्याने पेड सबस्क्रायबर्ससाठी आपल्या लैंगिक कृत्यांचे (Sexual Act) लाइव्ह-स्ट्रीमिंग (Live Sex) केले. आता या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे जोडपे त्यांच्या तिशीमध्ये असून, त्यांची सध्या चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबत एक गायक असणाऱ्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये इंटरनेट ब्राउझ करत असताना अश्लील कंटेंटची एक जाहिरात त्याला दिसली होती, त्यावेळी ही बाब उघडकीस आली.
या सेक्सच्या टीझरमध्ये जे जोडपे या गायकाला दिसले ते मीरा रोडचे असल्याचे त्याला जाणवले. नया नगर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी सांगितले की, तो टीजर पाहिल्यानंतर तक्रारदाराने एक खोटा लॉगिन आयडी तयार केला, सबस्क्रिप्शन फी भरली आणि लाईव्ह लैंगिक शो दर्शविणाऱ्या लिंकवर पोहोचला. त्या लिंकवर या जोडप्याने लाईव्ह सेक्स स्ट्रीम केला आणि दर्शकांच्या सूचनाही मागितल्या. हे दाम्पत्य मीरा रोडचे रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर लैंगिक कृत्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग वाढले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जोडपी अशी कृत्ये करताना दिसत आहेत. यामध्ये लैंगिक इच्छा किंवा कामवासनेच्या गोळ्या विकण्यासाठीही लैंगिक कृत्ये होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: बापाकडून 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डोंबिवली येथील धक्कादायक घटना)
जोडप्याने केलेले हे कृत्य कोणत्या दबावाखाली केले आहे का, याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्येही या जोडप्याची काही भूमिका आहे का हेही तपासले जात आहे. नुकतेच असे ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली होती. यामध्ये मुलींचे फोटो ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर पाठवले जात होते आणि हॉटेलमध्ये अशी लैंगिक कृत्ये केली जात होती.