डोंबिवली (Dombivli) येथून पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची (Sexual Harassment) घटना समोर येत आहे. बापाने आपल्या 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. इतकंच नाही तर आरोपी बाप पीडितेला आणि तित्या 8 महिन्यांच्या बहिणीला दारु पाजत असे. डोंबिवली मधील विष्णू नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई-वडीलांसोबत डोंबिवली येथे राहते. तिची आई कामानिमित्त गावाला गेल्यावर बापाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तिला शिवीगाळ करत मारहाण केली. मुलीने घाबरुन हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. (Dombivli Gang-Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये सारे 33 आरोपी अटकेत; 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश)
इतकंच नाही तर आरोपी बाप दारु पिऊन घरी यायचा आणि भांडण करायचा. 8 महिन्याच्या मुलीला देखील दारु पाजायचा. पत्नीने विरोध केल्यावर तिला मारहाण करायचा. पतीच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अखेर पोलिस स्टेशन गाठले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Thane Rape Case: ठाण्यामध्ये नोकरीचे अमिष दाखवून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार, पोलिसांनी आरोपी रिक्षावाल्याला घेतलं ताब्यात)
ही घटना बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी डोंबिवली मधून समोर आलेल्या सामुहिक बलात्काराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून बलात्कार, अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न अद्याप कायम आहे.