प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

मोबाईल अॅप्सद्वारे 'लाइव्ह पॉर्न शो' (Live Porn Show) प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अॅपच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना वर्सोवा पोलिसांनी सांगितले की, त्यांना गुगल प्ले स्टोअरवर 'पिहू ऑफिशियल अॅप' नावाच्या मोबाइल अॅप्लिकेशनबद्दल इनपुट मिळाले होते. त्यांना माहिती मिळाली होती की, या अॅपवर लाईव्ह सेक्स टेलिकास्ट केले जाते आणि यासाठी लोकांकडून 1,000 ते 10,000 रुपये शुल्क आकारले जाते.

माहिती मिळाल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी रविवारी (5 नोव्हेंबर) वर्सोवा येथील फोर बंगलो येथील एका इमारतीतील एका फ्लॅटवर या प्रकरणाच्या संदर्भात छापा टाकला. या छाप्यात मुंबई पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये 20 वर्षीय तनिषा राजेश कनोजिया, 27 वर्षीय रुद्र नारायण राऊत आणि 34 वर्षीय तमन्ना आरिफ खान यांचा समावेश आहे. या सर्वांना अॅपच्या कारवाईत सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या तिघांवर भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमांखाली अश्लील कृत्य करणे, तरुणांना अश्लील साहित्य विकणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. (हेही वाचा: Ulhasnagar Crime: उल्हासनगर येथे सरईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या, चार जणांना अटक)

या वर्षाच्या सुरुवातीला अशाच एका घटनेत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे बाल पोर्नोग्राफी कंटेंट बाळगल्याच्या आणि तो शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. CNN-News18 च्या रिपोर्टनुसार, आरोपी 35 वर्षीय पुरुष गेल्या चार वर्षांपासून एका लहान मुलाचे लैंगिक शोषण करत होता. त्याने अल्पवयीन मुलाचे नग्न व्हिडिओ आणि फोटो काढले होते, जे त्याने त्याच्या ऑनलाइन क्लाउड अकाउंटवर अपलोड केले होते.