Shivam Co-operative Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील 'शिवम सहकारी बँक'वर (Shivam Co-operative Bank) मोठी कारवाई केली आहे. RBI ने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. याअगोदर रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने RBI ने ही मोठी कारवाई केली आहे. परवाना रद्द केल्याने या बँकेतील ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवम सहकारी बँकेतील 24 कोटी 40 लाखांच्या अपहारप्रकरणी अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. याशिवाय भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने शिवम सहकारी बँकेवर ही मोठी कारवाई केली आहे. (वाचा - Bank Strike: बँक संघटनांचा 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप; सलग तीन दिवस Bank राहणार बंद)
या कारवाईनंतर शिवम सहकारी बँकेला 29 जानेवारी पासून आर्थिक व्यवहार किंवा कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. आर्थिक स्थितीमुळे बँक आपल्या खातेदारांना त्यांची सर्व रक्कम परत देण्यास असमर्थ आहे. (वाचा - Vasantdada Nagari Sahakari Bank Osmanabad: उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द; आरबीआयचा निर्णय)
गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने आरबीआयने ही मोठी कारवाई केली होती.