उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँक (Vasantdada Nagari Sahakari Bank Osmanabad) परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून रद्द (Bank License Cancels) करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बँकांचा परवाना रद्द करण्याचा सपाटाच आरबीआयने (Reserve Bank of India) लावला आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. परंतू, आता वसंतदादा नागरी सहकारी बँकेवरही परवाना रद्दची (Bank Licence Cancels) कारवाई झाल्याने या बँकेच्या ठेविदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दर्मयान, आरबीआयने ठेविदारांना काहीसा दिलासा दिल्याचे समजते.
वसंतदादा नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद शाखेचा परवाना रद्द करत असल्याबाबतचे एक पत्र आरबीआयने प्रसिद्ध केले आहे. बँक ही ठेविदारांच्या ठेवी परत करण्यास सक्षम नाही. बँकेतील अनेक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बँकेवर या पत्राद्वारे आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे या बँकेस व्यवहार करण्यास आजपासून मनाई करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.
आरबीआयकडून बँकेला परवाना रद्द होण्याबाबत पत्र मिळताच बँकेच्या लिक्विडेशन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ठेविदारांचे पैसे परत मिळण्यास हळूहळू सुरुवात होई. प्राप्त माहितीनुसार, ठेविदारांची सुमारे 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेने म्हटले आहे. त्यामुळे बँकेत ग्राहकाची कितीही मोठी ठेव असली तरी, सध्यातरी ग्राहकाला त्याच्या एकूण ठेवीबैकी केवळ 5 लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम काढता येणार आहे. (हेही वाचा,RBI Cancels License Subhadra Local Area Bank: कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द; आरबीआय कडून मोठी कारावाई )
आरबीआयने परवाने रद्द केलेल्या महाराष्ट्रातील बँका
- सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक- मुंबई
- सुभद्रा लोकल एरिया बँक- कोल्हापूर
- मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक- जालन
- कराड जनता बँक- सातारा
- वसंतदादा नागरी सहकारी बँक- उस्मानाबाद
दरम्यान, वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या जवळपास 99% ग्राहकांच्या ठेवी परत देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला आरबीआयने याबाबत पत्राद्वारे आदेश दिले आहेत. या पत्रानुसार ही बँक आदा दिवाळखोरीत काढली जाणार आहे. तसेच, तिच्या बँकेच्या कामकाजावरही बंदी घातली जाणार आहे.