आरबीआयने पुढे म्हटले आहे की, सुभद्रा लोकल एरिया बँकेजवळ आपल्या ठेविदारांना देण्यासाठी आवश्यक निधी (Liquidity) नाही. बँकेचे कामकाज ज्या पद्धतीने सुरु होते ते तसेच पुढे ठेवण्यास जर परवानगी दिली असती तर त्याचा परिणाम ग्राहक आणि ठेविदारांच्या आर्थिक भविष्यावर झाला असता. (हेही वाचा, Mantha Urban Cooperative Bank: जालना येथील मंठा अर्बन बँकेवर आरबीआयकडून 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध)
आरबीआयने सुभद्रा बँकेवर कारवाई करत या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयचा हा निर्णय 24 डिसेंबर 2020 ला बँकेचे आर्थिक व्यवहार थांबल्यानंतर लागू करण्यात आला. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर बँकेला कोणत्याही प्रकारचा तत्काळ, दीर्घकालीन अथवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यावर बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट अन्वये स्थगिती देण्यात आली आहे. ही बँक बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्या येईल असेही आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयने यापूर्वीही महाराष्ट्रातील अशा अनेक बँकांना दणका दिला आहे. यात कराड जनता सहकारी बँक लिमिटेडचाही समावेश आहे. या बँकेचाही परवाना आरबीआयने रद्द केला होता.