Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

Leopard Kills 10-Year-Old Boy in Beed: बीड जिल्ह्यात ( Beed) काही दिवसांपूर्वी बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. यातच बिबट्याचा हल्ल्यात आज 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आष्टी तालुक्यातील (Ashti) किन्ही येथे घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. आष्टी तालुक्यात बिबाट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

स्वराज भापकर असे मृत मुलाचे नाव आहे. स्वराज हा आपल्या काकासोबत शेतात काम करत होता. दरम्यान, बिबट्या झुडपात दबा धरून बसलेला होता. झुंडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे स्वराजवरती हल्ला चढवला आणि उचलून नेले. त्यानंतर स्वराजचा काका आणि गावातील इतर लोकांनी त्याची शोधाशोध करायला सुरूवात केली. मात्र, काही अंतरावर गेल्यावर स्वराजचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्वराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरु आहे. हे देखील वाचा- Pune Murder: धक्कादायक! फक्त 100 रुपयांच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या; पुण्यातील घटना

'ही घटना अत्यंत दुर्देंवी आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी शेतमजुरांना एकटे न जाता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधून घरी परतावे. महत्वाचे म्हणजे लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी गावकऱ्यांना केले आहे.