बदालापूर मधील मॅपल सिटी कॉम्प्लेक्स आणि परिसरात मंगळवारी संध्याकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या कॉम्प्लेक्स मधील एका महिलेने बिबट्याला पाहिल्याचा दावा केला आहे. तिने तिच्या फोनमध्ये बिबट्यांच्या हालचालींचा व्हिडिओ ही शूट केला आहे. वनाधिकारी प्रमोद ठक्कर आणि त्यांना टीमकडून या परिसराची पहाणी केली जात आहे. तसेच नागरिकांनी घाबरुन जाऊन नये असे आवाहन ही केले आहे.
वनविभागाकडून बिबट्या दिसलेल्या परिसरात रेंजरची गस्त अधिक वाढवली आहे. वनाधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, बदलापूरच्या पट्ट्यात बिबट्या दिसून आल्याचे मलंग गड आणि माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या वनविभागाने मान्य केले आहे. मात्र नागरिकांना आता सध्या धोका नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(Leopard Attack: आरे कॉलनीत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लावले सुचना फलक)
दरम्यान, आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याआधी त्याने शेतकऱ्यांच्या दोन शेळ्यांना कत्राप येथे ठार मारले होते. बिबट्याच्या अशा वावरामुळे टेकवरील नागरिकांकडून अधिकच भीती व्यक्त केली जात आहे.(Watch Video: पोलिसाच्या प्रसंगावधानमुळे कर्जत रेल्वे स्थानकावरील अपघात टळला, पाहा व्हिडिओ)
तर गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील आरे परिसरात सुद्धा बिबट्याचा अधिक वावर वाढला असून त्याने नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना ही उघडकीस आल्या आहेत. तर एक वृद्ध महिला रात्रीच्या वेळी घराबाहेर बसली असता अचानक बिबट्याने पाठीमागून येत तिच्यावर हल्ला केला होता. महिलेने त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी तिच्याकडील काठीने सुद्धा त्याला मारले. पण बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेला जखमा झाल्या. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले होते.